Pune | Thu, 30 July 2026

No Ad Available

ऑस्ट्रेलियन संसद सदस्य रॉय बटलर यांनी घेतली विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट

Admin | 4 views
ऑस्ट्रेलियन संसद सदस्य रॉय बटलर यांनी घेतली विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. २९ : ऑस्ट्रेलियाचे संसद सदस्य रॉय बटलर यांनी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांची विधानभवनात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विविध क्षेत्रांतील सहकार्य, औद्योगिक विकास, तसेच तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी ​ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ सल्लागार व व्यवसाय विश्लेषक जॉन क्लेमेंट्स, वरिष्ठ सल्लागार व व्यवसाय विश्लेषक रॉयल क्रिक्टन, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, अध्यक्ष, हॉर्स ग्रुप, तमिळनाडूचे  (समन्वयक) लक्ष्मीनरसिंहन, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव मेघना तळेकर, सचिव डॉ. विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठ्ये उपस्थित होते.

भेटीदरम्यान उपसभापती सचिन अहिर यांनी महाराष्ट्रातील उद्योग, ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगती आणि ई-व्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) क्षेत्रातील ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. तसेच, महाराष्ट्रातील चाकण परिसरातील विकसित होत असलेले औद्योगिक क्लस्टर आणि ऑस्ट्रेलियन उद्योगांशी भविष्यात होऊ शकणाऱ्या सहकार्याबाबत त्यांनी भाष्य केले. यावेळी ऑस्ट्रेलियन संसद सदस्य रॉय बटलर यांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या, विशेषतः मराठी भाषिक नागरिकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचे कौतुक केले. दोन्ही देशांमधील व्यावसायिक, औद्योगिक आणि कौशल्यावर आधारित सहकार्य अधिक दृढ करण्यावर या भेटीत भर देण्यात आला.

​0000

मोहिनी राणे/स.सं.

 

 

 

 


Join WhatsApp