Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

पटना येथे झालेल्या नॅशनल कुराश स्पर्धेत सोहम देवकरची रौप्यपदकाची कामगिरी

Admin | 25 views
पटना येथे झालेल्या नॅशनल कुराश स्पर्धेत सोहम देवकरची रौप्यपदकाची कामगिरी

राहुल मोरे, (समाजसत्ता प्रतिनिधी)


पटना (बिहार) येथे सुरू असलेल्या नॅशनल कुराश स्पर्धेत गुरुकुल विद्या मंदिर गोखळी या शाळेचा विद्यार्थी सोहम संजय देवकर याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक पटकावले आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

सोहमने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. अंतिम फेरीत त्याने दमदार लढत देत द्वितीय क्रमांक मिळवला. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा, शिक्षक, पालक तसेच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल शाळेच्या वतीने सोहमचे अभिनंदन करण्यात आले असून त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सोहमच्या या कामगिरीमुळे गुरुकुल विद्या मंदिर गोखळीचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल झाले आहे.


Join WhatsApp