दि .१७ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद आणि महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, राज्यस्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेत १७ वर्षे वयोगट इंडियन राउंड आर्चरी क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्यातून गुरुकुल गोखळीचा इयत्ता दहावी मध्ये शिकणारा संस्कार खिलारे यांनी द्वितीय क्रमांक मिळवून राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे.
अत्यंत नेमकेपणाने लक्ष्यभेद करत संस्कार यांनी प्रतिस्पर्ध्यांमध्ये वेगळी छाप पाडली.
स्पर्धेदरम्यान दाखवलेल्या संयम, लक्ष, मानसिक ताकद आणि सरावाच्या जोरावर संस्कार यांनी शाळेचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केले. गुरुकुल गोखळीच्या शिक्षकांनी संस्कारचे विशेष कौतुक करत त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्कारच्या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून भविष्यात राष्ट्रीय पातळीवरही तो नक्कीच आपली बौद्धीक व मानसिक पातळी सिद्ध करेल असा विश्वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब हरणावळ सर यांनी व्यक्त केला सोबत मार्गदर्शक शिक्षक जुबेर पठाण सर यांचेही कौतुक केले.
