Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी संस्थेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Admin | 35 views
झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी संस्थेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

नागपूर, दि. २ :  गोधनी येथील झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी या संस्थेतर्फे श्री गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संस्थेस भेट देऊन ‘श्रीं’चे पूजन केले व आरतीत सहभाग घेतला.

यावेळी आमदार परिणय फुके, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, संस्थेचे अध्यक्ष महेश साधवानी, विरेंद्र कुकरेजा, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे प्रमुख शैलेश जोगळेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, तसेच घनश्यामजी कुकरेला, जयप्रकाश गुप्ता, गिरीष साधवानी, असरानी, संस्थेचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी, उपाध्यक्ष एस.ई. चौधरी आदी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गणेश उत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. संस्थेचे प्रमुख महेश साधवानी यांनी स्वागत करुन संस्थेच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.

०००


Join WhatsApp