Pune | Thu, 30 July 2026

No Ad Available

मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आढावा बैठक

Admin | 6 views
मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आढावा बैठक

मुंबई, दि. २७ : रायगड जिल्ह्यातील थळ नवगाव, ता.अलिबाग येथील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आरसीएफ कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

बैठकीत मच्छीमार बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित कामांचा समन्वय साधून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार तसेच आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

मोहिनी राणे/स.सं

 

 


Join WhatsApp