Pune | Thu, 30 July 2026

No Ad Available

महिला समुपदेशन केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

Admin | 4 views
महिला समुपदेशन केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २९ : महिला व बालकांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील भांडुप पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पात्र स्वयंसेवी संस्थांकडून बातमी प्रसिद्ध झाल्यापासून कार्यालयीन कामकाजाचे दहा दिवसांच्या आत अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्जदार संस्थेची आवश्यक नोंदणी, महिला समुपदेशन क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव, एमएसडब्ल्यू (MSW) उत्तीर्ण दोन समुपदेशक, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल, बँक स्टेटमेंट तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. यापूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या स्वयंसेवी संस्थांनीही नव्याने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, दुसरा टप्पा, पहिला मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई–७१ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


Join WhatsApp