Pune | Sat, 06 June 2026

No Ad Available

मुंबई शहरात कुस्ती व जिम्नॅस्टिक उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

Admin | 7 views
मुंबई शहरात कुस्ती व जिम्नॅस्टिक उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

मुंबई, दि. ५ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, यांच्यावतीने कुस्ती व जिम्नॅस्टिक या खेळांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच खासगी क्रीडा मंडळांतील खेळाडूंनी या शिबिरांचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

जिम्नॅस्टिक प्रशिक्षण शिबीर दिनांक ९ ते १८ जून २०२६ या कालावधीत बीपीसीए कॉलेज, वडाळा येथे आयोजित करण्यात येणार आहे. तसेच कुस्ती प्रशिक्षण शिबीर १५ ते २४ जून २०२६ या कालावधीत लालबहादूर शास्त्री व्यायामशाळा, माटुंगा येथे होणार आहे. ही दोन्ही प्रशिक्षण शिबिरे पूर्णपणे विनामूल्य असून सहभागी खेळाडूंना अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कुस्ती शिबिरासाठी दत्तात्रय माने (मो. ८८८८८५१६२२) तसेच जिम्नॅस्टिक शिबिरासाठी फुलचंद कराड (मो. ९८२३७२९०२८) यांच्याशी संपर्क साधावा.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 


ताज्या बातम्या

Join WhatsApp