Pune | Mon, 15 June 2026

No Ad Available

मुंबई उपनगरातील शासकीय वसतिगृहांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Admin | 2 views
मुंबई उपनगरातील शासकीय वसतिगृहांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १५ : मुंबई उपनगर जिल्ह्यात सहायक आयुक्त समाज कल्याण अंतर्गत दोन मुलींचे व सहा मुलांचे असे एकूण आठ शासकीय वसतिगृह आहेत. या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या राहण्याची, भोजनाची मोफत सुविधा असून विद्यार्थ्यांना मासिक निर्वाहभत्ता, स्टेशनरी रक्कम देण्यात येते. तसेच अन्य सोयी सुविधा देण्यात येतात. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त मुंबई उपनगर रविकिरण पाटील यांनी केले आहे.

मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलुंड (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) या वसतिगृहात १०० विद्यार्थी क्षमता मंजूर असून १६ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता- पार्श्वनाथ कॉ.हौ.सो., D-१०,सर्वोदय नगर, मुलुंड (पश्चिम) जैन मंदिराजवळ, मुंबई -८०.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, कांदिवली (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) या वसतिगृहात मंजूर विद्यार्थी क्षमता १०० असून ३४ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता- ठाकूर संकुल, व्हिडिओकॉन टॉवर समोर, कांदिवली (पू) मुंबई-१०१.

महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे शासकीय वसतिगृह, जोगेश्वरी या वसतिगृहात १५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून २० रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता – चांदीवाला कंपाऊंड, आक्सा मस्जिद रोड, मिल्लत हॉस्पिटलच्या मागे, जोगेश्वरी (प).

संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर या वसतिगृहात १५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून ८ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता – आर.सी. चेंबूरकर मार्ग, जैन मंदिर समोर, बेगर होम कंपाऊंड जवळ, चेंबूर मुंबई-७१

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर युनिट १ ( विभागीय स्तर) या वसतिगृहात २५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून ४२ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता – आर.सी. चेंबूरकर मार्ग, जैन मंदिर समोर, बेगर होम कंपाऊंड जवळ, चेंबूर मुंबई-७१

माता रमाई आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चेंबूर युनिट ४ (विभागीयस्तर) या वसतिगृहात २५० विद्यार्थी संख्या मंजूर असून १८ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता – आर.सी. चेंबूरकर मार्ग, जैन मंदिर समोर, बेगर होम कंपाऊंड जवळ, चेंबूर मुंबई-७१.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर युनिट २ (विभागीयस्तर) या वसतिगृहात २५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून १०८ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता – आर.सी. चेंबूरकर मार्ग, जैन मंदिर समोर, बेगर होम कंपाऊंड जवळ, चेंबूर मुंबई-७१

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर युनिट ३ (विभागीयस्तर) या वसतिगृहात २५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून ११४ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता – आर.सी. चेंबूरकर मार्ग, जैन मंदिर समोर, बेगर होम कंपाऊंड जवळ, चेंबूर मुंबई-७१ असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

 


Join WhatsApp