Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची १३ व २० जानेवारी रोजी विशेष मुलाखत

Admin | 5 views
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची १३ व २० जानेवारी रोजी विशेष मुलाखत

  • सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व सायबर सुरक्षेवर सखोल मार्गदर्शन

मुंबई, दि. ९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय कार्यक्रमात ‘सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि सायबर सुरक्षा’ या विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत दोन भागांत प्रसारित होणार आहे. पहिला भाग दि. १३ व दुसरा भाग दि. २० जानेवारी रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरुन प्रसारित होईल.

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, त्याचबरोबर सायबर फसवणूक, ऑनलाईन आर्थिक गुन्हे, बनावट संदेश, फेक प्रोफाइल्स, वैयक्तिक माहितीचा गैरवापर अशा सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर कसा करावा, कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात, सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत, सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ काय करावे, याबाबत पोलीस उप आयुक्त कराड यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.

पहिला भाग मंगळवार, 13 तर दुसरा भाग 20 जानेवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता पाहता येईल. ही मुलाखत निवेदक सुषमा जाधव यांनी घेतली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे

 X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

 Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/स.सं.

 

 


Join WhatsApp