Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

‘नव भारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत उसनवारी तत्वावर अर्ज करण्याचे आवाहन

Admin | 11 views
‘नव भारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत उसनवारी तत्वावर अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रमासाठी उसनवारी तत्वावर शिक्षक/ कर्मचारी/ अधिकारी यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज करण्यासाठी 22 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शालेय शिक्षण संचालक (योजना) यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.

केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम  राज्यातील वय वर्षे 15 व त्यापुढील वयोगटासाठी राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष  2026-27 पासून ते योजना सुरू असेपर्यंत उसनवारी तत्वावर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वा शासकीय सेवेत असलेल्या शिक्षक संवर्गातील कर्मचारी, उपशिक्षणाधिकारी किंवा तत्सम पदे गट ब, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक व तत्सम पद किंवा विस्तार अधिकारी, शिक्षण मधील शिक्षक कर्मचारी अधिकारी यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले होते. पुरेशी अर्ज संख्या आली नसल्याने हे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली.

अर्ज भरण्यासाठी संचालनालयाच्या संकेतस्थळावर गुगल लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्ज सादर करावयाचा कालावधी हा 15 मे रोजी सकाळी 10 वाजेपासून 22 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक अर्हता, अनुभव, मुलाखत, सादरीकरण, इत्यादीच्या आधारे नियुक्ती प्रक्रिया संचालनालय स्तरावर राबविण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी विहित यंत्रणेमार्फत मुदतीत आपले अर्ज संचालनालयास सादर करण्याचे आवाहन शिक्षण संचालक (योजना) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

०००००

बी.सी.झंवर /वि.सं.अ

 

 


Join WhatsApp