
छत्रपती संभाजीनगर, दि. १३ (जिमाका): ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे महत्त्व, इतिहास, बलिदानाची महती पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात शाळास्तरावर गुरुवार दि.१५ पासून जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण व जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर यांनी दिली आहे.
यासंदर्भात करण्यात आलेले नियोजन या प्रमाणे
प्रभात फेरी दि.१५ ते २३ जानेवारी. तसेच माहितीपट व कार्यक्रमाचे गाणे दाखवणे.
यानिमित्ताने निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात-
१.सहा समाज आणि श्री गुरु तेग बहादुर यांचे नाते.
२.शिख,सिकलेकर ,बंजारा,मोहियाल,सिंधी, लबाना या समाजाचे श्री गुरुतेग बहादुर यांचे नाते श्री गुरु तेग बहादुर साहेब यांची शिकवण.
३.भाई सती दास आणि भाई मती दास यांचे गुरु प्रति समर्पण.
४.श्री गुरु तेगबहादुर यांचा गृहस्थाश्रमातील कालखंड
५.श्री गुरु तेगबहादुर यांचे बालपण आणि त्यांचा गृहस्थातील कालखंड
६.श्री गुरु तेगबहादुर यांचा बाबा बकाला येथील कालखड.
७.श्री गुरु तेगबहादुर यांना हिंद दी चादर असे का संबोधित करतात.
८.तेग बहादुर सन्मानाची कथा.
९.भाई माखन शहा लबाना यांना झालेला दिव्य साक्षात्कार.
१०.श्री गुरु तेगबहादुर यांचा बाबा बकाला ते आनंदपुरचा प्रवास.
११.श्री गुरु तेगबहादुर यांचे पटना येथील वास्तव्य.
१२.भाई सती दास, भाई मती दास, भाई दयाला आणि भाई दिलिप जी यांची शहादत.
हे विषय असतील.
शैक्षणिक स्पर्धाचे आयोजन व वेळापत्रक
दि.१७ ते १९ या कालावधीत चित्रकला स्पर्धा. गायनस्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतील.
तालुकास्तरावरील स्पर्धेचा निकाल तयार करुन प्रत्येक स्पर्धेतून प्रथम /द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय स्पर्धा दि.२१ रोजी होणार आहे. जिल्हास्तरीय प्रथम /दिव्तीय/तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना दि. २५ रोजी हिंद दि चादर या कार्यक्रमाच्या वेळी गौरविण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पथनाट्य आयोजीत करुन त्याच्या व्हिडीओ क्लिप्स दिलेल्या लिंक्स मध्ये अपलोड करावयाच्या आहेत.भित्तीपत्रकांचे वाचन ही घेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
०००
