Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्याच्या सकल जैन संघ यांच्या वतीले २५ हजार ताक पाकिटांचे मोफत वाटप

Admin | 158 views
आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्याच्या सकल जैन संघ यांच्या वतीले २५ हजार ताक पाकिटांचे मोफत वाटप

पुणे  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त सकल जैन संघ, पुणे यांच्या वतीने पुणे स्टेशन रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात अनुयायांसाठी विनामूल्य ताक व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. "मानव सेवा परमो धर्म... सर्व धर्म समभाव" या उदात्त उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे उ‌द्घाटन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, राज्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर थंडगार ताक मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव पाहायला मिळाले. या उपक्रमांतर्गत सुमारे २५ हजारांहून अधिक ताकाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला सकल जैन संघाचे अध्यक्ष अचल जैन, हरेश शहा, प्रतीक मालू, अनिल गेलडा, समीर जैन, ललित गुंदेशा, सतीश शहा, विनोद सोलंकी, संदीप पारेख, मुकेश छाजेड, गौतम छाजेड, बालचंद्र कटारिया, अल्पेश गोगरी, निलेश शहा, पंकज नवलखा, नरेंद्र रामशीना, सुशील राठोड तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाचा संदेश देत आंबेडकर जयंतीचा उत्सव अधिक अर्थपूर्ण ठरला.

सकल जैन संघ


Join WhatsApp