Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहन

Admin | 10 views
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहन

मुंबई, दि.५ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन्ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक नवयुवतींसाठी १९ जानेवारी २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६६ आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीनी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावे, असे मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. तरी. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे १२ ते १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे या वेबसाईट वर सर्च करून त्यामधील सीडीएस ६६ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेले) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

या सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावेत :

अ) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

ब) उमेदवार लोकसंघ आयोग (यूपीएससी) नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डीः training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, मुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यानी प्रसिद्ध प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

०००

गजानन पाटील/स.सं


Join WhatsApp