Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे समर्पित व्यक्तिमत्व गमावले –  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Admin | 12 views
डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे समर्पित व्यक्तिमत्व गमावले –  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, दि.15 : प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ, विचारवंत आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने मानसिक आरोग्य क्षेत्रात संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने कार्य करणारे व्यक्तिमत्व गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत डॉ. नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केवळ एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणूनच नव्हे, तर एक प्रख्यात लेखक, कवी, नाटककार आणि विचारवंत म्हणून  हजारो तरुणांच्या आणि नागरिकांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा दिली. डॉ. नाडकर्णी यांनी स्थापन केलेल्या ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ आणि ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्रातील त्यांचे योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने वैद्यकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील एक मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी डॉ. नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

00000


Join WhatsApp