Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या तरतुदीसंदर्भातील आदेश जुनाच

Admin | 2 views
घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या तरतुदीसंदर्भातील आदेश जुनाच

मुंबई, दि. 14 : महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कुठलाही नवीन आदेश निर्गमित केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगाने 14 फेब्रुवारी 2012 मध्येच निर्गमित केलेला आहे.

जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नवीन नियम लागू केला असल्याचे वृत्त समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून प्रसारित होत आहे; परंतू हे वस्तुस्थितीला धरुन नाही. याबाबतचा आदेश जुनाच आहे. त्या 14 फेब्रुवारी 2012 रोजीच्या आदेशानुसार जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करु शकतील; परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहानेदेखील फिरता येणार नाही.

0000

जसंअ/राज्य निवडणूक आयोग


Join WhatsApp