Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

मच्छिमार कामगारांच्या सामाजिक, आर्थिक सुरक्षेला प्राधान्य – मंत्री नितेश राणे

Admin | 12 views
मच्छिमार कामगारांच्या सामाजिक, आर्थिक सुरक्षेला प्राधान्य – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.२७ : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयात महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळ स्थापनेनंतर झालेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठकीत मंत्री राणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळ अधिनस्त नोंदणीकृत मच्छिमारांचे जीवनमान उंचावणे ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. मंडळाच्या माध्यमातून कामगारांना अधिकाधिक लाभ मिळतील. यासाठी प्रशासनाने पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धतीने काम करावे. तसेच जास्तीत जास्त मच्छिमारांची नोंदणी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग व कामगार विभाग यांनी संयुक्तपणे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. प्रलंबित लेखापरीक्षण आणि न्यायालयीन प्रकरणे वेळेत निकाली काढण्यावरही भर दिला जाईल. तसेच कामगार मंत्री यांच्याकडे याविषयी लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ


Join WhatsApp