Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

महानगरपालिका निवडणूक; आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद

Admin | 11 views
महानगरपालिका निवडणूक; आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद

मुंबई, दि .५ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) हे कार्यालय बुधवार, १४ जानेवारी २०२६ आणि गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कोणतेही नियमित कामकाज होणार नाही, अशी माहिती परिवहन विभागामार्फत देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पंचायत व नगरपालिका निवडणुकीसाठी आवश्यक त्या कर्मचाऱ्यांचे, वास्तूंचे व वाहनांचे अधिग्रहण करण्याचे अधिकार संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार उप निवडणूक अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथील इमारत व परिसर दोन दिवसांसाठी अधिग्रहित केला आहे.

त्यामुळे १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथील सर्व सेवा व कामकाज पूर्णतः बंद राहणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि संबंधित सेवांच्या पर्यायी तारखांना आपली कामे पुनर्नियोजित करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

000000

संजय ओरके/विसंअ


Join WhatsApp