Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम विविध देशातील ३० दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव

Admin | 11 views
महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम विविध देशातील ३० दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव

नवी दिल्ली:७, देशाच्या राजधानीतील महाराष्ट्र सदन‘ या भव्य वास्तूने आणि येथील उच्च दर्जाच्या शिष्टाचाराने  जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगातील विविध देशांतील 30 नामांकित दिग्गज शेफच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी महाराष्ट्र सदनाला सदिच्छा भेट दिली. महाराष्ट्राचे वैभव आणि येथील आदरातिथ्य पाहून हे आंतरराष्ट्रीय पाहुणे अक्षरशः भारावून गेले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी या शिष्टमंडळाचे उत्साहात स्वागत केले. यावेळी आयोजित विशेष सोहळ्यात त्यांनी सर्व परदेशी पाहुण्यांना राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून दिली.

या भेटीदरम्यान ऑस्ट्रेलियायुक्रेनमॅसेडोनियामलेशियामालदीवदक्षिण आफ्रिकासर्बियाफिलिपिन्सउझबेकिस्तानश्रीलंकामलेशियासिंगापूरव्हिएतनामफ्रान्सदुबईकेनियामॉरिशसइंडोनेशियामालदीव  यांसारख्या विविध देशांतील 30 पाककला तज्ज्ञांनी महाराष्ट्र सदनाच्या वास्तूशिल्पाची पाहणी केली. निवासी आयुक्त आर. विमला यांनी या प्रतिनिधींना महाराष्ट्राची विविधता आणि जागतिक स्तरावर नावाजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचे महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे निवासी आयुक्तांच्या हस्ते सर्व पाहुण्यांना पारंपरिक दिवे‘ भेट म्हणून देऊन त्यांचा अनोखा सन्मान करण्यात आला. भारतीय संस्कृतीत प्रकाशाचे प्रतीक मानले जाणारे हे दिवे स्वीकारताना पाहुण्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला.

या भेटीदरम्यान विदेशी पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेतला. त्यांनी श्रीखंडपुरणपोळीझुणका-भाकरी आणि कढी-मसालाभात यांसारख्या पारंपरिक मराठी व्यंजनांचा आस्वाद घेतला. या चविष्ट मेजवानीने जागतिक स्तरावरील हे शेफ भारावून गेले. तसेचविदेशी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी हिंदी गाण्यांचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होताज्यामध्ये भारतीय संगीताच्या तालावर हे सर्व मान्यवर मनसोक्त थिरकले.

निवासी आयुक्त आर. विमला आपल्या मनोगतात म्हणाल्या कीजगाच्या पाठीवरील विविध देशांतून आलेल्या कल्पक आणि प्रतिभावंत शेफचे यजमानपद भूषवणेही महाराष्ट्र शासनासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. अशा भेटींमुळे केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हेतर दोन देशांमधील ऋणानुबंध अधिक दृढ होतात.

या शिष्टमंडळातील सदस्यांनी महाराष्ट्र सदनातील शिष्टाचारस्वच्छता आणि इथल्या जिव्हाळ्याच्या आदरातिथ्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडेसहायक निवासी आयुक्त स्मिता शेलारमहाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे आणि सदनातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

00000000


Join WhatsApp