Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

पालकमंत्री नितेश राणे यांची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतली भेट

Admin | 32 views
पालकमंत्री नितेश राणे यांची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतली भेट

सिंधुदुर्गनगरी दिनांक २(जिमाका): नुकत्याच नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची औपचारिक भेट घेतली. या भेटीच्या वेळी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, चालू प्रकल्प, जनतेच्या सुविधा तसेच आगामी विकास आराखड्यांवर चर्चा झाली.

पालकमंत्री राणे यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेणे हे आपले ध्येय असावे, असे मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा उभारणी, पर्यटन विकास, शिक्षणक्षेत्रातील सुधारणा तसेच रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

०००


Join WhatsApp