Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ड्रोन व कृषी यंत्राचे वाटप

Admin | 13 views
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ड्रोन व कृषी यंत्राचे वाटप

यवतमाळ, दि.१२ (जिमाका) : राष्ट्रीय कृषी विकास यांत्रिकीकरण योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत १० शेतकऱ्यांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कृषी औजार व यंत्राचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगामपूर्व बैठकीपूर्वी या कृषी औजार व यंत्राचे वाटप गुरुवारी (दि.७) करण्यात आले. यावेळी खा. प्रतिभा धानोरकर, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आ. किसन वानखेडे, आ. संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे व शेतकरी उपस्थित होते.

कृषी विभागाच्या कृषि यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत रामेश्वर रामराव तायडे रा.मनपूर ता. यवतमाळ यांना नांगर व ट्रॅक्टर खरेदीसाठी १ लाख ७२ हजार ५०० रुपये, संदीप देवराव जावके, रा.बेलोरा ता. यवतमाळ यांना ट्रेलरसाठी ८० हजार रुपये, विलास शिवरामजी पारधी, रा.किन्हाळा ता. कळंब यांना बहू पीक मळणी संत्र्यासाठी २ लाख २५ हजार रुपये, प्रदीप उत्तमराव मुन, रा. सावरगाव, ता. कळंब यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख २५ हजार रुपये, दत्ता देवबाजी रा. मारनर, खातखेडा ता. कळंब यांना यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख २५ हजार रुपये, शिवकुमार गोकुळदास पांडे, रा. चिली (ई), ता. महागाव यांना ड्रोन साठी ४ लाख रुपये, सीमा गजानन चिव्हाणे रा. वाऱ्हा ता. राळेगाव यांना जेसीबीसाठी ३ लाख ५७ हजार रुपये, अंकुश पुंडलिक राठोड रा. दहेली ता. पांढरकवडा यांना जेसीबीसाठी २ लाख ८६ हजार रुपये, किशोर रामराव झाटे रा. अंतरगाव ता. बाभूळगाव यांना बहू पीक मळणी यंत्रासाठी २ लाख २५ हजार रुपये आणि किशोर किसन शिरभाते रा. राणी अमरावती ता. बाभूळगाव यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी यावेळी दिली.

कृषी यंत्र खरेदीसाठी २२२८ शेतकऱ्यांना १२ कोटी वितरित

राष्ट्रीय कृषी विकास यांत्रिकीकरण योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात कृषी यंत्र खरेदीसाठी जिल्ह्यातील २२२८ शेतकऱ्यांना तब्बल १२ कोटी ५८ लाख ४४ हजार रुपये अनुदान रक्कम वितरित करण्यात आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर, रोटावेटर, पावर टिलर, पावर विडर, थ्रेशर, हार्वेस्टर, ट्रेलर, सीड ड्रिल, कल्टवेटर, डोझर, बॉयलर, कॉटन ष्रेडर इ. कृषी यंत्रांसाठी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याचे आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

000000

 


Join WhatsApp