Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

राजधानीत डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Admin | 12 views
राजधानीत डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, २७ : भारताचे पहिले कृषिमंत्री तथा शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या  जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून  अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार तसेच महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अक्षय गाडेकर यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि कृषी तथा शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अविस्मरणीय योगदानाचा सर्वांना परिचय करून दिला.

००००


Join WhatsApp