
नवी दिल्ली, दि. ८ : ज्ञान,भक्ती आणि सेवाभाव जागृत करणारे संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

या प्रसंगी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापक महाराष्ट्र सदन प्रमोद कोलपते यांनी संत जगनाडे महाराज यांच्या भक्तिमय जीवनाचा आणि वारकरी संप्रदायातील त्यांच्या अविस्मरणीय योगदानाचा सर्वांना परिचय करून दिला.


०००
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
