Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाकडून जाहीर

Admin | 32 views
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाकडून जाहीर

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल घोषित केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२४ दि. २७ ते २९ मे, २०२५ या  कालावधीत घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र ठरलेल्या १५१६ उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम टप्प्याटप्प्याने लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या निकालाकडे राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले होते. निकाल वेळेवर जाहीर झाल्यामुळे उमेदवारांच्या भावी नियोजनाला गती मिळणार आहे. मुलाखतीचे वेळापत्रक व पुढील सर्व माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://mpsc.gov.in उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोगाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 

 


Join WhatsApp