Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

राज्यपाल आचार्य देवव्रत यांची अवनखेड ग्रामपंचायतीला भेट

Admin | 9 views
राज्यपाल आचार्य देवव्रत यांची अवनखेड ग्रामपंचायतीला भेट

नाशिक, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत अवनखेड ला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाची प्रशंसा केली.

यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संख्ये, तहसीलदार मुकेश कांबळे, सरपंच नरेंद्र कोंडाजी जाधव, उपसरपंच विनायक निकम, ग्रामसेवक सुभाष कर्डक आदी उपस्थित होते.

यावेळी सरपंच श्री. जाधव यांनी राज्यपाल महोदयांना ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

00000


Join WhatsApp