Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पिंपरखेड शाळेत वृक्षारोपण

Admin | 11 views
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पिंपरखेड शाळेत वृक्षारोपण

नाशिकदि. १ (जिमाका वृत्तसेवा) :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाच्या ‘एक पेड माँ के नाम’  उपक्रमांतर्गत  राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील कै. लक्ष्मण बाबाजी धात्रक माध्यमिक विद्यालय येथे वृक्षारोपण केले.

यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,  सामाजिक न्याय मंत्री प्रा. डॉ. अशोक उर्ईके, आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, आदिवासी विकास आयुक्त लीना बन्सोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, आदिवासी विकास प्रकल्प नाशिकच्या प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, कळवणच्या काश्मिरा संख्ये, उपवनसंरक्षक (पश्चिम) सिद्धेश सावर्डेकर, उपवनसंरक्षक (पूर्व) राकेश सेपट आदी उपस्थित होते.

त्यानंतर, राज्यपाल श्री. देवव्रत यांनी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पिंपरखेड येथे भेट दिली. यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन  तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शबरी उत्पादने त्यांचे स्वागत केले.

यावेळी विद्यार्थ्यांच्यावतीने लाठीकाठी प्रात्यक्षिके करत आणि सलामी देऊन राज्यपाल महोदयांना मानवंदना दिली. त्यानंतर विद्यार्थिनींनी लेझीम  प्रात्यक्षिकाराद्वारे उपस्थितांची मने जिंकली. या मुलांचे राज्यपाल महोदयांनी कौतुक केले. हा परिसर अतिशय सुंदर असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

०००


Join WhatsApp