Pune | Mon, 01 June 2026

No Ad Available

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदान

Admin | 12 views
राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदान

मुंबई, दि.२३ : राज्यसभा सदस्य सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या जागेचा कार्यकाळ ७ जुलै २०२८ पर्यंत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १ जून २०२६ पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून १८ जून २०२६ रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार ८ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ९ जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर ११ जून ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने २० जून २०२६ पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

0000

संजय ओरके/विसंअ


Join WhatsApp