
मुंबई, दि. १४ : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएसएस) अंतर्गत २०२५-२६ साठी नूतनीकरणासाठी पात्र असलेले तसेच २०२४-२५ मधील डी-डुप्लिकेशन प्रक्रियेत समाविष्ट असलेले तथापि विहित कालावधीत अर्ज करू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी एनएसपी २.० पोर्टल २२ जानेवारी २०२६ पर्यंत पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व संबंधित शाळांनी पात्र विद्यार्थ्यांचे नूतनीकरण अर्ज एनएसपी २.० पोर्टलवर २२ जानेवारीपूर्वी ऑनलाईन सादर करून घ्यावे. त्याचप्रमाणे सर्व अर्जांची प्रथम स्तर आणि द्वितीय स्तर पडताळणी २२ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी. कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याने सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेत मिळेल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
00000
बी.सी.झंवर/विसंअ
