
मुंबई, दि. १० : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या विविध प्रकल्पासाठी पर्यावरण, वने यासह विविध विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी सर्व संबंधित विभागांशी समन्वय करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या विविध विषयांचा आढावा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात घेतला.
मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, सागरी महामंडळाच्या जागेवरील स्टॉलसाठीचे भाडे तातडीने निश्चित करण्याची कार्यवाही करावी. होर्डिंग्ज उभारण्याच्या कामांना गती द्यावी. नोव्हेंबरपर्यंत सर्व नियोजित होर्डिंग्ज उभारण्यात यावीत. या सर्व प्रकल्पासाठी लागणाऱ्या परवान्यांसाठी पर्यावरण विभागाशी समन्वय ठेवावा, असे निर्देशही श्री. राणे यांनी दिले.
०००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/
