Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना माहिती पुस्तिके’चे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अनावरण

Admin | 2 views
‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना माहिती पुस्तिके’चे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, दि. २५ :राज्यातील महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचावी या उद्देशाने महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा (आसीडीएस) योजनेच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आसीडीएस आयुक्त कैलास पगारे, उपायुक्त विजय क्षीरसागर यांसह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनांची माहिती पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. या समावेशक पुस्तिकेमुळे अंगणवाडी सेवा, पोषण योजना, बालसंवर्धन उपक्रम तसेच नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची सविस्तर माहिती एका ठिकाणी उपलब्ध होईल. यामुळे योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल.”या माहिती पुस्तिकेत कार्यरत व नव्या योजनांची ध्येय-उद्दिष्टे, लाभार्थी पात्रता, आकडेवारीनिहाय माहिती आणि अंमलबजावणीची प्रक्रिया यांचा समावेश करण्यात आला आहे.

सशक्त महिला आणि सुपोषित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प साकार करताना अशी माहिती पुस्तिका समाजासाठी उपायुक्त ठरणारअसल्याचेहीमहिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी नमूद केले.

000

जयश्री कोल्हे/स.सं

 

 


Join WhatsApp