
मुंबई, दि. 27: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मराठी भाषा गौरव दिनानीमित्त’ मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत ही मुलाखत मंगळवार दि. 3 मार्च 2026 रोजी रात्रौ 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
मराठी भाषा संवर्धन आणि प्रशासनात मराठीचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत आहे. यासाठी मराठी भाषा विभागामार्फत साहित्य निर्मिती, संशोधन, भाषांतर प्रकल्प आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठीचा प्रसार यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच संगणकीय शब्दसंग्रह, मराठी सॉफ्टवेअर साधने आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठीचा वापर वाढविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांद्वारे नव्या पिढीत मराठीविषयी अभिमान निर्माण केला जात असून शासन, संस्था आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून मराठी अधिक सक्षम व समृद्ध होईल, असा विश्वास डॉ. कुलकर्णी यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून व्यक्त केला.
0000
जयश्री कोल्हे/विसंअ
