
मुंबई, दि. १९: हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव -1 जितेंद्र भोळे आणि सचिव-3 डॉ.विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय याचे सचिव -4 शिवदर्शन साठ्ये, उपसचिव विजय कोमटवार, उपसभापती यांचे खासगी सचिव अविनाश रणखांब, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही शिवरायांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

सकाळपासूनच विधानभवनाचा परिसर तुतारी, सनई, चौघड्याच्या निनादाने दुमदुमून गेला होता. पारंपरिक वेषातील तुतारीवादक हे या शिवजयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.
०००
