Pune | Sat, 25 April 2026

No Ad Available

कुंभमेळा विकास कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Admin | 7 views
कुंभमेळा विकास कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. २५:  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे विकास कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी काळात या कामांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार हिरामण खोसकर,  कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हा  पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, महंत हरिगिरीजी महाराज (जुना आखाडा), महंत रविंद्रपुरीजी महाराज  (निरंजनी आखाडा), महंत शंकरानंद (आनंद आखाडा), महंत गिरिजानंद, महंत रामकृष्ण लहवितकर यांच्यासह मंदिर देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्याधिकारी योगेश जाधव, कैलास घुले, मनोज थेटे यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कार केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामे करण्यात येत आहेत.  सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत आहे. त्यामुळे या कामांना अधिक गती देण्याचा राज्य शासनाचा  प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वर येथील विकास कामाच्या अनुषंगाने येथील सर्व आखाड्यांच्या महंतांशी लवकरच चर्चा करणार असून त्यासाठी एक बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

000


Join WhatsApp