Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा उत्साहात साजरा

Admin | 19 views
महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा उत्साहात साजरा

नवी दिल्ली, दि. १९: महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे मराठी नववर्षाचा शुभारंभ दर्शविणारा ‘गुढी पाडवा’ उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

या प्रसंगी जुने व नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात विधिवत गुढी उभारण्यात आली. फुलांनी, कापडाने आणि पारंपरिक वस्तूंनी सजविलेल्या गुढीची पूजा निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला आणि निवासी आयुक्त गुंतवणूक सुशील गायकवाड यांच्या हस्ते करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांसह विविध अधिकारी, कर्मचारी तसेच दिल्लीतील मराठी बाधव उपस्थित होते.

‘गुढी पाडवा’ हा सण नवीन सुरुवात, विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या निमित्ताने उपस्थितांना दोन्ही निवासी आयुक्तांनी मराठी नववर्ष समृद्ध, आनंदी आणि यशस्वी जावो, अशा शुभेच्छा दिल्या.

०००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली


Join WhatsApp