Pune | Sun, 19 April 2026

No Ad Available

महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सोहळा मुंबईत २५ व २६ मार्च रोजी 

Admin | 15 views
महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सोहळा मुंबईत २५ व २६ मार्च रोजी 

मुंबई, दि.२४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे देण्यात येणारा महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा २५ व २६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न होणार असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त, बाळसाहेब सोळंकी यांनी दिली.

२५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गेटवे ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह दरम्यान व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन सोहळा, व्यसनमुक्ती विषयावरील विविध चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले आहे. तसेच, २६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे तसेच विभागाच्या आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०० व्यक्ती आणि १३ संस्थांना महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. यामध्ये लेखक, कवी, पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी आणि सेवाभावी संस्थांचा समावेश आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 


Join WhatsApp