Pune | Wed, 22 April 2026

No Ad Available

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा चाचणी अर्जांची अंतिम तारीख २८ एप्रिल

Admin | 5 views
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा चाचणी अर्जांची अंतिम तारीख २८ एप्रिल

मुंबई, दि. २२ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या निवड प्रक्रियेसाठी २८ एप्रिल २०२६ पर्यंत https://forms.gle/ix76WxCTeTtZFH6R8 या लिंकवर अथवा missionlakshyavedhmumcity@gmail.com या ईमेलवर करावे, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी दिली आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू घडवणे हा आहे. या उपक्रमांतर्गत शुटींग, टेबल टेनिस व वेटलिफ्टींग या क्रीडा प्रकारांसाठी जिल्हास्तरावर निवड चाचणी आयोजित करण्यात येत आहे.

या निवड चाचण्यांसाठी २१ वर्षांखालील खेळाडू पात्र ठरणार असून, जिल्हास्तर पदक प्राप्त व विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्रीयस्तर स्पर्धा सहभाग घेतलेले इच्छुक खेळाडुंनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी  नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी  निलेश गराटे – (9702212925),  साहिल उतेकर – (9702171004),   समृद्धी देवळेकर – (8779727571) यांच्याकडे संपर्क साधावा.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 


ताज्या बातम्या

Join WhatsApp