Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा…! संकल्प वसुंधरा रक्षणाचा…!

Admin | 1 views
निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा…! संकल्प वसुंधरा रक्षणाचा…!

मुंबई,दि. ०२: होळी व धुलिवंदनानिमित्त सर्वांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी या उपक्रमाच्या अनुषंगाने पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना पर्यावरणपूरक पाच रंगाचा समावेश असलेला संच देऊन पर्यावरणस्नेही होळी शुभेच्छा दिल्या.

होळी व धुलिवंदन तसेच रंगपंचमी हा सण राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रंग खेळताना ते पर्यावरणपूरक व नैसर्गिक असावेत, यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक होळी, धुलिवंदन व रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत मंत्री मुंडे यांनी पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमी व धुलिवंदन साजरी करण्याचे आवाहन केले आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांना भेटून पर्यावरणपूरक रंगाचे संच देऊन शुभेच्छा दिल्या.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ


Join WhatsApp