Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

नोंदणी व मुद्रांक विभागातील गट – ड संवर्गातील अंतिम निवड यादी जाहीर

Admin | 7 views
नोंदणी व मुद्रांक विभागातील गट – ड संवर्गातील अंतिम निवड यादी जाहीर

मुंबई, दि. २७ : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या  www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर २७ फेबुवारी २०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात अंतिम निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन करुन नियुक्ती देण्याचे निश्चित केलेले असून, उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे बहुउद्देशिय सभागृह, पाचवा मजला, पुणे येथे सोमवार, २ मार्च २०२६  रोजी सकाळी ८: ०० वाजता हजर रहावे. याबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वरील नमूद संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे, असे पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

गजानन पाटील/विसंअ

 


Join WhatsApp