Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

नवी मुंबईत ९ मार्चपासून ‘ढोलकीफड तमाशा महोत्सव’

Admin | 13 views
नवी मुंबईत ९ मार्चपासून ‘ढोलकीफड तमाशा महोत्सव’

मुंबई, दि. ०६ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून ९ मार्च ते १३ मार्च, २०२६ या कालावधीत ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम ९ मार्च ते १३ मार्च, २०२६ या कालावधीत सायंकाळी ६.३० वा. सिडको सेक्टर ५, गांवदेवी मैदान, सानपाडा, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे. ९ मार्च,२०२६ रोजी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.नाराणगांव, जि.पुणे; १० मार्च, २०२६ रोजी संगीताची राणी कमल अनिल कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.आगाशिवनगर, दांगटवस्ती, ता.कराड, जि.सातारा; ११ मार्च, २०२६ रोजी वगसम्राट मा.शांताराम चव्हाण दहिवतकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.दहिवत, ता.अमळनेर, जि.जळगांव; १२ मार्च,२०२६ रोजी तमाशा महर्षी आनंदराव महाजन लोकनाट्य तमाशा मंडळ, आसोदा रोड, शनिपेठ, जळगाव; १३ मार्च,२०२६ रोजी तमाशा सम्राट तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, मु.पो.नारायणगांव, जि.पुणे यांचे सादरीकरण होणार आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ढोलकीफड तमाशा महोत्सव पार पडणार आहे. हा महोत्सव रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, नवी मुंबई परिसरातील रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ


Join WhatsApp