Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

पालकमंत्र्यांनी दाखविला चित्ररथांना हिरवा झेंडा

Admin | 14 views
पालकमंत्र्यांनी दाखविला चित्ररथांना हिरवा झेंडा

अमरावती, दि. १० (जिमाका) : जिल्हा नियोजन व विकास समिती आणि अनुसूचित जाती उपयोजनेतून योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे साकारण्यात आलेल्या दोन चित्ररथांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्रामगृह येथे हिरवा झेंडा दाखविला. दोन्ही चित्ररथ जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये पोहोचून योजनांची माहिती देणार आहे.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार राजेश वानखेडे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी ग्रामीण भागात योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी चित्ररथाची संकल्पना महत्वाची ठरणार आहे. चित्ररथ हा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जनतेपर्यंत नेण्यात यावा. चित्ररथाच्या माध्यमाने शाळांमधून विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि उच्च शिक्षणासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा नियोजनच्या सर्वसाधारण योजनेतून प्रचार रथाच्या माध्यमातून मोदी आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, राष्ट्रीय पशूधन अभियान, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपाटिका, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आयुष्मान भारत कार्ड या योजनांची प्रसिद्धी करण्यात येत आहे.

अनुसूचित जाती उपयोजनेच्या निधीतून समता चित्ररथ तयार करण्यात आला आहे. यातून भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, कन्यादान योजना, मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह, कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भारत सरकार मॅट्रीकोपूर्व शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी निवासी शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनांचा प्रचार करण्यात येत आहे.

0000000

 


Join WhatsApp