Pune | Mon, 20 April 2026

No Ad Available

फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर बक्स यांचे स्वागत

Admin | 11 views
फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर बक्स यांचे स्वागत

मुंबई, दि. ०६: फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर बक्स भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे आज दोन दिवशीय दौऱ्यासाठी मुंबईत आगमन झाले.

हॉटेल ताज पॅलेस येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने गणेश वंदन नृत्य सादर करून राज्याच्या संस्कृतीची ओळख त्यांना करून देण्यात आली. यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे उपस्थित होते. यावेळी टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर बक्स यांची भेट घेतली.

०००

निलेश तायडे/विसंअ


Join WhatsApp