Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

पुणे मार्केट यार्डातील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत लवकरच पणन मंत्री यांच्या दालनात बैठक – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

Admin | 3 views
पुणे मार्केट यार्डातील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत लवकरच पणन मंत्री यांच्या दालनात बैठक – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. १८ : पुणे मार्केट यार्डमधील लिंबू विक्री नियंत्रणाबाबत लवकरच पणन मंत्री यांच्या दालनात बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले. या बैठकीस शेतकरी प्रतिनिधींनाही बोलविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

विधानभवनात यासंदर्भात झालेल्या बैठकीस सहकारी संस्था पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, पणन विभागाच्या अवर सचिव माधवी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी राजाराम धोंडकर, सभापती प्रकाश जगताप व संबंधित उपस्थित होते.

गेल्या काही वर्षांपासून फळ विभागाऐवजी भाजीपाला विभागात डमी आडत्यांमार्फत लिंबू विक्री सुरू असल्याने फळ विभागातील मूळ लिंबू आडतदारांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर लिंबू विक्री केवळ फळ विभागातच होण्याबाबत बाजार समितीचे धोरण प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात निवेदनावर यावेळी चर्चा झाली.

०००

मोहिनी राणे /स.सं


Join WhatsApp