Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

राजधानी दिल्लीत राजे उमाजी नाईक जयंती साजरी

Admin | 34 views
राजधानी दिल्लीत राजे उमाजी नाईक जयंती साजरी

नवी दिल्ली, दि. ७ : इंग्रजाचे कर्दनकाळ आणि आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कोलपते यांनी उमाजी नाईक यांच्या कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.

०००


Join WhatsApp