
मुंबई, दि. २४ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दुपारी ३.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आगमन झाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महापौर रितू तायडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
तसेच लेफ्ट जनरल डी. एस. कुशवाह, पोलीस महासंचालक सदानंद दाते, एयर व्हाईस मार्शल पी. एस. वाडोदकर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सौरभ कटियार, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
000
