Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

शिक्षण आयुक्तालय इमारतीच्या कामाला गती द्या – राज्यमंत्री डॉ .पंकज भोयर

Admin | 4 views
शिक्षण आयुक्तालय इमारतीच्या कामाला गती द्या – राज्यमंत्री डॉ .पंकज भोयर

मुंबई, दि. १८: पुणे येथील शिवाजीनगर भागातील भांबुर्डा परिसरात शालेय शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षण आयुक्तालयाच्या इमारतीचे या इमारतीमुळे शालेय शिक्षण विभागाची कार्यालये एकाच छताखाली येतील. इमारतीचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी कामाला गती द्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत इमारत बांधकामाचा आढावा घेताना राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव एम.बी. ताशिलदार, शालेय शिक्षण आयुक्तालयाचे सहसंचालक हारून अत्तार, कक्ष अधिकारी शितल पाटील आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, इमारतीमध्ये शिक्षण संचालक, शालेय पोषण आहार, प्राथमिक शिक्षण विभाग यांची कार्यालये व विश्रामगृह आहेत. इमारतीचे बांधकाम 414 चौरस मीटर जागेत होत आहे. इमारत परिसरात 377 वाहनांची क्षमता असलेले दोन वाहन तळ आहेत. तरी इमारतीच्या आवारात पुरेश्या पार्किंगची व्यवस्था असल्याची खात्री करावी. शालेय शिक्षण विभागाचे पुणे येथील आयुक्तालयाची इमारत विभागाचा लौकिक ठरणार आहे. त्यामुळे इमारतीचे बांधकाम दर्जेदार करण्यात यावे. इमारत बांधकामाला विलंब करु नये असे निर्देशही त्यांनी दिले.

विभागाने संबंधित कंत्राटदाराकडून विविध कालमर्यादेत काम पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करावी. इमारत बांधकामातील सर्व अडचणी दूर करण्यात याव्या, असे निर्देशही राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिल्या.

इमारती विषयी थोडक्यात

इमारतीमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी बैठक व भोजनकक्ष, स्वागत कक्ष, उपहारगृह, प्राथमिक शिक्षण कार्यालय, संचालक कार्यालय, शिक्षण संचालक माध्यमिक व प्रौढ शिक्षण कार्यालय, नोंदणी कक्ष, शालेय पोषण आहार कार्यालय, ग्रंथालय, प्राथमिक शिक्षण परिषद व ई गव्हर्नन्स कार्यालय, शिक्षण आयुक्त कार्यालय आणि विश्रामगृह यांचा समावेश आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ


Join WhatsApp