Pune | Mon, 02 March 2026

No Ad Available

श्री गुरु तेग बहादुर शहिदी समागम कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे नियोजन

Admin | 1 views
श्री गुरु तेग बहादुर शहिदी समागम कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेचे नियोजन

नवी मुंबई, (विमाका), दि. 1 : श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेने व्यापक तयारी केली. विविध विभागांच्या समन्वयातून भाविकांसाठी आवश्यक सेवा-सुविधांची प्रभावी व्यवस्था करण्यात आली.

कार्यक्रमस्थळी लाखो भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, टँकर व साठवण टाक्यांची व्यवस्था करण्यात आली. घनकचरा विभागाकडून शेकडो स्वच्छता कर्मचारी, घंटागाड्या व डस्टबिन्सच्या माध्यमातून परिसर स्वच्छ ठेवला गेला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी 250सुरक्षा रक्षक ‘ट्रॅफिक वॉर्डन’ व मदतनीस तैनात आहेत.

पाच बीएलएस व तीन एएलएस रुग्णवाहिका, 10 आयसीयू बेडसह 100 बेडची व्यवस्था तसेच 850 पेक्षा अधिक वैद्यकीय कर्मचारी कार्यकत आहेत. दिव्यांग व ज्येष्ठांसाठी 100 व्हीलचेअर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नेत्रतपासणी शिबिर व औषधोपचाराची सुविधाही देण्यात आली आहे.

उद्यान विभागाकडून खारघर परिसरातील रस्ते व चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले. अग्निशमन दलाकडून आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पाणीसाठा व आवश्यक उपकरणे सज्ज ठेवण्यात आली. भाविकांसाठी 30 ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात आली पिण्याचे पाणी व जीवनावश्यक साहित्य पुरविण्यात आले.
००००


Join WhatsApp