Pune | Wed, 04 March 2026

No Ad Available

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

Admin | 1 views
मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई, दि.४ :ससून डॉक येथील मच्छिमार, महिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या परिसराच्या आधुनिकीकरणाला वेग दिला जाईल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत चा सविस्तर आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे  मंत्री नितेश राणे यांनी घेतला. यावेळी मच्छिमारांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

ससून डॉक येथे मत्स्य व्यावसायिक आणि विशेषतः महिला कामगारांसाठी शासनाने बांधलेले विश्रामगृह तातडीने खुले करावे, असे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

बोटधारक आणि व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणींवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

मासे उतरवणे, साठवणूक आणि विक्री या साखळीत मच्छिमारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीला आमदार राजेश राठोड, मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००


Join WhatsApp