Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या महाराष्ट्र गणपती भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

Admin | 10 views
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या महाराष्ट्र गणपती भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

मुबंई, दि. २३ : महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने “महाराष्ट्र गणपती भव्यतम सोडत” १० सप्टेंबर २०२५ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांच्या कार्यालयात  सोडत सभागृह, टी ब्लॉक, पहिला मजला, दाणा बाजार, एपीएमसी मार्केट, सेक्टर १९-बी, वाशी, नवी मुंबई  या  ठिकाणी काढण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी कार्यालयाचे उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविली आहे.

या सोडतीमधून जनतेच्या “सर्वांगीण आर्थिक विकासासाठी” या ब्रीद वाक्याचा अवलंब करण्यात आला. या सोडतीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिले (सामायिक) बक्षिस तिकीट क्रमांक GB-03 12446 रूपये १,००,००,०००/- चे एक बारड लॉटरी सेंटर, सोलापूर येथील खरेदीदारास लागले आहे. रू. १,००,०००/- ची चार बक्षिसे व रू. १०,०००/- च्या आतील रकमेची ३,८५१ बक्षिसे लागली आहेत, सर्व बक्षिसांची एकूण रक्कम रू. १,२२,०१,५००/- इतकी आहे.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून १०,०००/- रुपयांवरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. १०,०००/- रुपयांच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

 


Join WhatsApp