Pune | Sun, 19 April 2026

No Ad Available

सेवा सुधारणांचा १५० दिवसांचा कार्यक्रम : ‘सेवाकर्मी प्लस’ मध्ये जि.प. छत्रपती संभाजीनगर राज्यात अव्वल

Admin | 12 views
सेवा सुधारणांचा १५० दिवसांचा कार्यक्रम : ‘सेवाकर्मी प्लस’ मध्ये जि.प. छत्रपती संभाजीनगर राज्यात अव्वल

छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- राज्य शासनाच्या प्रशासनाला आधुनिक बनवतानाच प्रशासनाला गति देण्यासाठी सेवाविषयक सुधारणांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. १५० दिवसांच्या या सुधारणा कार्यक्रमात ‘सेवा कर्मी प्लस’ या कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल आज मुंबई येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करणे  सेवाविषयक बाबींच्या सुधारणांकरिता १५० दिवसांचा कार्यक्रम दि. मे ते दि. ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला. तथापि,राज्यातील पूरपरिस्थितीमुळे या कार्यक्रमास दि. १० जानेवारी२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

काय होते या कार्यक्रमात?

या कार्यक्रमात प्रशासकीय सुधारणांमध्ये मनुष्यबळ विषयक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यात कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता याद्या प्रसिध्द करणेपदोन्नती करणेबिंदुनामावली नोंदवही अद्ययावत करणे,  अनुकंपा भरतीसरळसेवा भरतीकेंद्र शासनाच्या iGOT पोर्टलवर नोंदणी तसेच  प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे  सेवापुस्तिका अद्ययावत करणे या बाबींचा समावेश होता.

जि.प. छत्रपती संभाजीनगरची सर्वोत्कृष्ट कामगिरी

या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राघवेंद्र घोरपडे यांनी यशस्वी अंमलबजावणी केलीयामध्ये जिल्हा परिषद अंतर्गतच्या सर्व खाते प्रमुखांनी  त्यांच्या अधिनिस्त सर्व कर्मचाऱ्यांनी सहयोग दिलात्यामुळे जिल्हा परिषदछत्रपती संभाजीनगरच्या कामकाजाचे शासनस्तरावरुन गुणांकन होऊन राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषदछत्रपती संभाजीनगरचा समावेश झाला.

        या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आज मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

०००००


Join WhatsApp