Pune | Sun, 19 April 2026

No Ad Available

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला सार्वजनिक उपक्रम कंपनी संवर्गात प्रथम क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लीना बनसोड यांचा गौरव

Admin | 13 views
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला सार्वजनिक उपक्रम कंपनी संवर्गात प्रथम क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लीना बनसोड यांचा गौरव

नाशिक, दि. २८ मार्च (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स उपक्रमात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने सार्वजनिक उपक्रम कंपनी संवर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शबरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांचा आज सन्मान करण्यात आला.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे हा सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. शबरी विकास महामंडळाने ई गव्हर्नन्स उपक्रमात विविध उपक्रम राबविले. त्यांची तपासणी भारतीय गुणवत्ता परिषदेने (QCI) केली होती. त्यात शबरी महामंडळाने 84 गुण मिळविले. त्यात सेवा कर्मचारी प्रशिक्षण, सेवा पुस्तके अद्ययावत करणे, आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे. ज्येष्ठता सूची, पदोन्नती आणि बिंदूनामावलीची तंतोतंत अंमलबजावणी आदी उपक्रमांचा समावेश होता. तसेच आदिवासी बांधवांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महामंडळाने ‘शबरी नॅचरल्स’ (Shabari Naturals) हा ब्रॅण्ड विकसित केला आहे.

००००

शबरी आदिवासी विकास महामंडळाला मिळालेला पुरस्कार हे सामूहिक परिश्रमाचे यश आहे. यामुळे आदिवासी विकास आणि विपणन व्यवस्था अधिक बळकटीकरणासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी शबरी महामंडळ कटिबद्ध आहे.

लीना बनसोड,

व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक


Join WhatsApp