Pune | Thu, 15 January 2026

No Ad Available

‘दर्पण’ दिनानिमित्त दै. लोकवाहिनीच्या विशेषांकाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते प्रकाशन

Admin | 8 views
‘दर्पण’ दिनानिमित्त दै. लोकवाहिनीच्या विशेषांकाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर, दि.६: आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण साप्ताहिकामुळे साजऱ्या होणाऱ्या मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने प्रकाशित दै.लोकवाहिनीच्या विशेषांकाचे आज नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

माहिती संचालक कार्यालयात औपचारिकरित्या हे प्रकाशन पार पडले. यावेळी लोकवाहिनी वृत्तपत्राचे समूह संपादक डॉ. प्रवीण महाजन, विशेषांकाचे मानद संपादक नितीन कुळकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतपावर आदी  उपस्थित होते.

०००


Join WhatsApp